Udhampur Helicopter Crash: उधमपूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू

Jammu Kashmir Udhampur Helicopter crash Shivgarh Dhar near Two Pilots Succumb To Death

Udhampur Helicopter crash : जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार येथून लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस आणि लष्कराने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराचे पथक शिवगड धारच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर कोसळण्याच्या या घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. Jammu Kashmir Udhampur Helicopter crash Shivgarh Dhar near Two Pilots Succumb To Death


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार येथून लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस आणि लष्कराने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराचे पथक शिवगड धारच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर कोसळण्याच्या या घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, परिसरात दाट धुके आहे, त्यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश होते की क्रॅश लँडिंग, हे आताच सांगता येणार नाही. जम्मू -काश्मीर पोलिसांनी माहिती दिली की उधमपूरच्या पाटनीटॉप परिसराजवळ स्थानिक लोकांनी हेलिकॉप्टर खाली पडल्याची माहिती दिली होती. आम्ही त्या भागात टीम पाठवली आहे. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपूत अशी मृत सैन्याधिकाऱ्यांची नावे आहेत.

स्थानिकांनी घेतली धाव

जिल्ह्यातील शिवगड धार परिसरात सकाळी 10.30 ते 10.45 दरम्यान ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी सांगितले की स्थानिक लोकांनी हेलिकॉप्टरमधून पायलटला बाहेर काढले. हे हेलिकॉप्टर लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सचे आहे. उत्तर कमांडच्या संरक्षण प्रवक्त्याने अपघाताची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अपघाताशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे आणि लष्कर या संदर्भात एक निवेदन जारी करेल.

Jammu Kashmir Udhampur Helicopter crash Shivgarh Dhar near Two Pilots Succumb To Death

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण