नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना, म्हणाले – कोणतही सरकार कायम नसत


अमित ठाकरे म्हणाले की,”कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात”असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली.Amit Thakre’s first roar in Nashik ground, said that any government is not permanent


विशेष प्रतिनिधी

नाशिक : सर्वांचा हिशेब चुकता करणार’ असे पोस्टर्स नाशिकमध्ये सध्या ठिकठिकाणी लावलेले दिसून येत आहेत.आगामी महापालिका निवडणुक जवळ आली आहे.या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे चार दिवसांच्या नाशिक  दौऱ्यावर आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून शहराच्या तीनही विभागांमध्ये बैठकांचा आयोजन करण्यात आलं आहे.

या बैठकांमध्ये पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि शाखा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तेव्हा अमित ठाकरे म्हणाले की,”कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात”असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली.



पुढे अमित ठाकरे म्हणाले की एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. अनेक जण असल्याने तीन ठिकाणं बैठकी आहेत. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे.

राजसाहेब सगळीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शाखा अध्यक्ष महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद नाही. शाखाध्यक्ष महत्वाचा आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.

तसेच अमित ठाकरे म्हणाले की आम्ही आमचे काम करत राहणार. मुंबईत,पुणे,नाशिक सगळीकडे बैठक आहे. लोकांना कळलं की मनसेने किती काम केले आणि आमचे काम किती मेंटेन केले.

नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. मुंबईमध्ये खेळायला गार्डनदेखील कमी आहेत. सत्तेत आल्यावर सगळं करू, असं आश्वासन अमित ठाकरे यांनी दिलं.

Amit Thakre’s first roar in Nashik ground, said that any government is not permanent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात