अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान


बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.Ajit Pawar should come to my district and contest the elections, challenged Gopichand Padalkar


विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.

बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पडळकर म्हणाले, सांगली-सातारा जिल्हा सोडून मी पुण्यात येऊन लढलो. कोणतही पाठबळ नसताना १५ दिवसांत मी तयारी करुन लढलो. अजित पवार यांची मानसिकता बिघडल्यासारखी वाटत आहे. ते सारखे त्याच त्याच विषयांवर बोलत आहेत, राज्यात इतरही विषय आहे त्यांनी त्यावर बोलावे.



अजित पवारांचा मुलगाही त्यांच्या जिल्ह्यात दीड-दोन लाखांनी पडला होता. धमक असेल तर अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी. बारामतीमध्ये माझे डिपॉजिट जप्त झाले हे मी स्विकारले आहे. बारामतीकरांच्या निर्णयाचा मी आदर करतो, त्यांनी मला नाकारलं हे मी स्वीकारले आहे.

अजित पवार मला वारंवार अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू मी कुठेच अडकत नसल्यामुळे ते सारखं सारखं डिपॉजिटचं भांडवल करत आहेत.पडळकर म्हणाले, पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे व त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष आहे. 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे.पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे पुढे आली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत,

भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी, या सर्व अधिकाऱ्याच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचे काम केले असा आरोपही पडळकर यांनी केला.

Ajit Pawar should come to my district and contest the elections, challenged Gopichand Padalkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात