अजितदादा म्हणतात, घोटाळ्यांबाबत कायदेशीर कारवाई करायला वेळ नाही तेवढाच उद्योग आहे का आम्हाला??; मग ते ED कारवाईला सामोरे कसे जाणार??


प्रतिनिधी

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातील काही साखर कारखान्यांवर सुरू असलेल्या ED कारवाई बाबत एक वक्तव्य केले आहे. मला काही तेवढाच उद्योग नाही. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. कुठे कायदेशीर कारवाईसाठी मागे लागता. वकील द्या, त्यांच्या मागे जा एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?, असा सवाल त्यांनी केला आहे. Ajit pawar says, he works so hard that he could get no time to fight legal battle over ED sugar factories inquiries

त्यावर मग ते ED कारवाईला नेमके कसे सामोरे जाणार असा सवाल सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. अजित पवार घोटाळ्यांची चौकशी टाळण्यात माहीर आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केले होते. या पार्श्वभूमीवर कायदेशीर कारवाईसाठी वेळ नाही तर अजित पवार ED कारवाईला सामोरे कसे जाणार असा सवाल सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्षपदाचा पदभार विद्याधर अनास्कर यांनी स्वीकारला आहे. त्यावेळी अजित पवार उपस्थित होते. या सहकारामुळे राज्यात बदल आणि विकासदेखील झाला आहे. पण याच सहकाराला अनेकांनी नावे ठेवली आहेत. काही जणांनी चुकीचे काम केले असेल तर संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचे आहे असे होत नसल्याचे अजित पवारांनी सांगितले.

जरंडेश्वर साखर कारखान्याचा अजित पवारांचा संबंध आहे. त्याची सक्तवसूली संचलनालय ED चौकशी करीत आहे. असे ४५ साखर कारखान्यांचे घोटाळे ED चौकशीच्या रांगेत आहेत, असे राजू शेट्टींचे म्हणणे आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, माझा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल हायकोर्टात केस दाखल अशी बातमी पाहण्यास मिळाली. काही संबध नसताना अशा धादांत खोट्या बातम्या मीडिया देतो. मागेदेखील दोन तीन बातम्या अशाच आणल्या गेल्या.यामुळे लोकांमधील मीडिया बद्दल विश्वास उडत चालला आहे.

त्यावर तुम्ही त्याविरोधात कायदेशीर मार्गाने जाणार का? असे विचारले असता अजितदादा म्हणाले की, मला काही तेवढाच उद्योग नाही. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. कुठे कायदेशीर कारवाईसाठी मागे लागता. वकील द्या, त्यांच्या मागे जा एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?”.

अजितदादांच्या याच वक्तव्यावरून कायदेशीर कारवाई नाही, तर अजितदादा चौकशांना सामोरे कोणत्या मार्गाने जाणार असा सवाल विचारला जात आहे.

Ajit pawar says, he works so hard that he could get no time to fight legal battle over ED sugar factories inquiries

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण