नितीश कुमारांच्या पक्षाचे आमदार बनियन – अंडर पँटवर तेजस एक्सप्रेसमध्ये फिरले, प्रवाशाशी भांडले… आणि पोट बिघडल्याचा खुलासा केला


वृत्तसंस्था

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाचे आमदार बनियन – अंड़र पँटवर तेजस एक्सप्रेसमध्ये फिरले. प्रवाशाशी भांडले… नंतर त्यांनी खुलासा देखील दिला… त्यांचे पोट खराब होते…!! wearing the undergarments as my stomach was upset during the journey: Gopal Manda

त्याचे असे झाले, नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाचे आमदार गोपाल मंडल हे तेजस एक्सप्रेसमध्ये चढले. त्यानंतर लगेच ते बनियन – अंडर पँटवर आले आणि आपल्या रिझर्व्ह सीटवर बसले. एक प्रवासी आपल्या कुटुंबासह त्या डब्यात आले. त्यांचेही सीट आरक्षित होते. गोपाल मंडल बनियन – अंडर पँटवर डब्यात फिरायला लागले. त्यावर प्रवाशाने आक्षेप घेतला. तेव्हा गोपाल मंडल यांनी त्याला शिवीगाळ केली. अर्वाच्य बोलले. डब्यात गोंधळ माजला. रेल्वे पोलीसांनी ताबडतोब येऊन त्यांना समजावले.

पण दरम्यानच्या काळात दुसऱ्या प्रवाशांनी गोपाल मंडल यांचा बनियन – अंड़र पँटवरचा विडिओ व्हायरल केला. त्यामुळे आमदार गोपाल मंडल कसे वागतात हे जगाला कळले. इथपर्यंत सगळे ठीक घडले… पण त्यानंतर त्यांनी खुलासा जो खुलासा केला तो अधिक मजेशीर आहे… माझे पोट खराब होते म्हणून मी बनियन – अंडर पँटवर फिरत होतो. मी कधी खोटे बोलत नाही… त्यांचा हा खुलासा जरी खरा मानला तरी प्रवाशाला शिवीगाळ का केली आणि अर्वाच्य का बोलले याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.

wearing the undergarments as my stomach was upset during the journey: Gopal Manda

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण