अहिल्यादेवी जयंती सोहळा राष्ट्रवादीकडून हायजॅक; फडणवीसांचे शरसंधान


 प्रतिनिधी

मुंबई : महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने चौंडीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून येथे दिग्गज नेते देखील हजेरी लावत आहेत. पण या जयंती सोहळ्यादिनी देखील राजकारण झाल्याचे दिसून आले. Ahilya Devi Jayanti celebrations hijacked by NCP; Fadnavis’s Sharasandhan

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मंगळवारी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. तेथे मोठा मेळावा घेतला. पण हा कार्यक्रम संपेपर्यंत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलीसांनी चौंडीत जाण्यापासून रोखून धरले. हे दोन्ही नेते चौंडी येथे अहिल्यादेवींचे दर्शन घेण्यासाठी जात होते. पण चौंडीत दाखल होण्याआधीच त्यांच्या वाहनांचा ताफा पोलिसांनी चौंडीच्या सीमेवर अडवून धरला होता. यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.



सोहळा हायजॅक करण्याचा प्रयत्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला कुठलाही अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व पक्षांचे लोक त्याठिकाणी अहिल्यादेवींचे आशिर्वाद घेण्यासाठी येतात. पण यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करुन अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा राष्ट्रवादीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हणत फडणवीस यांनी टीका केली आहे.

हे राष्ट्रीय पर्व

अहिल्यादेवी होळकर यांचे थेट वंशज असलेल्या राम शिंदे यांना देखील तिथे त्रास देण्यात आला. जे अहिल्यादेवी यांच्या विचारांवर चालतात त्यांना त्यांच्या जन्मस्थळी जाण्यापासून अडवले. अशाप्रकारे या जयंती सोहळ्याला हायजॅक करण्याचे कारण काय आहे?, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. अहिल्यादेवी जयंती पर्व हे राष्ट्रीय पर्व असून ते सर्वांनी मिळून साजरे करायचे असते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन असे हायजॅकिंग बंद झाले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

Ahilya Devi Jayanti celebrations hijacked by NCP; Fadnavis’s Sharasandhan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात