माहीम, सांगली कुपवाड मध्ये बुलडोझर कारवाईनंतर नंतर मुंब्रा मधील बेकायदा दर्गे – मशिदी मनसेच्या टार्गेटवर; 15 दिवसांचा अल्टिमेटम!!


प्रतिनिधी

मुंबई : गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली बेकायदा मजार आणि सांगली कुपवाडमधील बेकायदा मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता. कारवाई झाली नाही तर माहिममधल्या त्या मजारीशेजारी गणपतीचे मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने दोन्ही ठिकाणांवर बुलडोझर चालवून बेकायदा बांधकामे पाडून टाकली. After bulldozer operation in Mahim, Sangli Kupwad then illegal dargah-mosques in Mumbra targeted by MNS

शिंदे फडणवीस सरकारच्या या कायदेशीर कारवाईनंतर मनसेचा राजकीय हुरूप वाढला असून आता मनसेच्या रडारवर मुंब्रामधल्या बेकयदा मशिदी आणि दर्गे आले आहेत. मुंब्रा मधील बेकायदा मशिदी आणि दर्ग्यांवर बुलडोजर चालवण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. यासाठी अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही समाजकंटकांनी 7 ते 8 बेकायदा दर्गे उभारल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. या बेकायदा दर्ग्यांचे फोटोही अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे १५ दिवसात हटवा अन्यथा या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.

मनसेच्या या इशाऱ्यानंतर शिंदे फडणवीस सरकार मुंब्रा मधील देखील बेकायदा मशिदी आणि दर्ग्यांवर बुलडोझजर केव्हा चालवणार??, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.



 मुंब्राच्या डोंगरात बेकायदा दर्गे

मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवर अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप केला आहे.

याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. या दर्ग्यांची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश असल्याचाही मनसेचा आरोप आहे.

या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांचेकडून सर्व सोईसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? तसेच हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. या जागेवर अतिक्रमण करीत असलेले भू माफिया नक्की कोण आहेत?, यांना पाठीशी कोण घालत आहे?, असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला आहे.

After bulldozer operation in Mahim, Sangli Kupwad then illegal dargah-mosques in Mumbra targeted by MNS

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात