प्रतिनिधी
नाशिक : माहीम, सांगली कुपवाड, मुंब्रा येथील बेकायदा दर्गा मशिदींच्या विरोधात जो एल्गार हिंदू समाजाने पुकारला आहे, त्याचे पडसाद नाशिकमध्ये ही उमटले असून शहरातील आनंदवली परिसरात प्रसिद्ध नवश्या गणपती शेजारील बेकायदा दर्ग्यावर तात्काळ बुलडोझर चालवावा, असा इशारा हिंदू समाजाने दिला आहे. नवशा गणपती शेजारी बेकायदा दर्ग्यावर जर प्रशासनाने कारवाई केली नाही, तर आम्हालाही कारसेवकांचा इतिहास आहे, असा थेट इशारा सुदर्शन राष्ट्र निर्माण ट्रस्टचे सुरेश चव्हाणके यांनी दिला आहे.
चव्हाणके यांनी, गुरुवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांसह नवश्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेव्हा त्यांनी या हजरत सैय्यद हसन रांझेशाह बाबा रहेमतुल्लाह अलैह दर्ग्याची पाहणी केली. त्यानंतर हा दर्गाच पूर्ण बेकायदा अनधिकृत असून हे बांधकाम पाडण्याचा सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हा दर्गा हटविला नाही, तर कारसेवकांचा अनुभव आमच्या पाठिशी असल्याचेही चव्हाणके यांनी सांगितले.
आनंदवली परिसरात पूर्वी येथे फक्त पेशवेकालीन मंदिर होते. या परिसरात नंतर अतिक्रमण वाढत जाऊन एवढा मोठा दर्गा स्थापन झाला. हा दर्गा आज मंदिरापेक्षा मोठा झाला आहे. नाशिक महापालिकेचे प्रशासनाला याबाबत रितसर निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करणार आहे. जर हा प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही आमच्या पद्धतीने दर्ग्याचा प्रश्न निकाली लाऊ असेही चव्हाणके म्हणाले. दरम्यान यावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकर्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त दर्ग्याबाहेर तैनात करण्यात आला होता.
नियमाप्रमाणे कारवाई करू
नवश्या गणपती शेजारी असलेल्या दर्ग्याची महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जागेची पाहणी लवकरच करतील. अनाधिकृत बांधकाम असेल तर नियमाप्रमाणे ते हटवले जाईल. : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त.
प्रशासनाने कारवाई करावी
नवशा गणपती परिसरातील सदर जागा ही पेशव्यांची आहे. गणपती दर्शनाला येणार्या भक्तांसाठी येथे निवासाची सोय करण्यात आली होती. या अनधिकृत दर्ग्याबाबत मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात येईल. मनपाच्या पुढच्या धोरणावर आमचा निर्णय राहील. : सुरेश चव्हाणके, अध्यक्ष, सुदर्शन राष्ट्र निर्माण ट्रस्ट
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App