उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…

Raj Thakrey and Uddhav Thakrey New

बेकायदेशीर जागेत बांधलेला दर्गा ही नवीन गोष्ट नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर घेतलेल्या जाहीर सभेतून, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय, राज्यात विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारले जाणारे दर्गा व मशि‍दींचाही मुद्दा उपस्थित केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. I did not listen to the speech of Raj Thackeray yesterday as he has been talking about the same thing for many years  Uddhav Thackeray

‘’मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण ते अनेक वर्षांपासून एकसारखंच बोलत आहेत. बेकायदेशीर जागेत बांधलेला दर्गा ही काही नवीन बाब नाही. या अगोदरही त्या ठिकाणी विविध नेते निवडून आले होते, तेव्हा कारवाई केली गेली नाही. पण ही स्क्रीप्ट वरून आली आहे.’’ असं उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत राज्यात ठिकठिकाणी मुसलमानांकडून बेकायदा मशिदी उभ्या होत असल्याचा मुद्दा मांडताना मुंबईतील माहीम समुद्रकिनाऱ्याकडील बेकायदा दर्गा आणि सांगली-कुपवाडा महापालिका क्षेत्रातील बेकायदा मशिदीचा उल्लेख केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज राज्य सरकारने माहीम येथील अनधिकृत दर्गा हटवला, आता सांगलीतील बेकायदा मशिदीवरही हातोडा मारण्यात येणार आहे.

याशिवाय २०१९च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात जे सत्तानाट्य घडलं त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला होता.  ‘’२०१९ ची निवडणूक संपली आकडेवारी आली. आकडेवारी आल्यानंतर एकत्र निवडणूक लढवून युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं, की अडीच वर्षांचा मुख्यमंत्री तुम्ही मान्य करा. निवडणुकीपूर्वी बोलला होतात का? चार भिंतींमध्ये म्हणे मला अमित शहांनी सांगितलं. जाहीरपणे का नाही सांगितलं? ज्यावेळी व्यासपीठावर बसून नरेंद्र मोदी सांगत होते की, पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, आक्षेप का नाही घेतला? अमित शाह ज्यावेळी व्यासपीठावर सांगत होते, की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, तेव्हा आक्षेप का नाही घेतला?’’ असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला होता.

I did not listen to the speech of Raj Thackeray yesterday as he has been talking about the same thing for many years  Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात