Raj Thackeray : भोंग्याविरुद्ध मनसेचा कल्ला; पण श्रेयावर मुख्यमंत्र्यांच्या नावाने शिवसेनेचा श्रेयावर डल्ला!!


प्रतिनिधी

मुंबई : मशिदींच्या भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटम नंतर बहुतांशी मशिदींवरील भोंगे खाली उतरवले गेले, तर काहींनी भोंग्यावरून अजान देणे बंद केले. राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर दिसून आलेल्या या परिणामानंतर राज्यातील सरकारमधील पक्ष असलेल्या शिवसेनेने आता उतरवलेल्या भोंग्याचे श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे. After the ultimatum, the horns on most of the mosques were lowered

शिवसेनेकडून एक पोस्ट व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी ‘करे क्ट कार्यक्रम याला म्हणतात!’ असे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी दंगली घडवू पाहणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजाला शांततेचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार, मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी भोंगे वाजलेच नाही पण दंगलही नाही!असे म्हणत मशिदींवरील उतरवलेले आणि न वाजवल्या गेलेल्या भोंग्यांचे श्रेय हे राज्याच्या शांत स्वभावाच्या मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगत याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

शिवसेनेची श्रेय घेण्यास सुरुवात

मशिदींवरील अजान ऐकवले जाणारे भोंगे ३ मे पर्यंत उतरवा नाही तर ४ तारखेपासून जिथे जिथे भोंगे वाजवले जातील त्याच्या समोर हनुमान चालिसा ऐकवली जाईल असा इशारा दिला होता.या अल्टीमेटमचा फरक मुंबईसह राज्यात दिसून आला असून याला कायदेशील बळ असल्याने मुस्लिम बांधवांनीही भोंगे स्वत:हून उतरवले तर काहींनी याचा वापर करणे बंद केले. राज ठाकरे यांनी केवळ मशिदींवरच नव्हे तर मंदिरांवरही भोंग काढा, पण आदी मशिदींवरील काढा मग मंदिरावर काढले जावे, अशी भूमिका घेतली होती. या प्रकरणानंतर राज ठाकरे यांना अडचणीत आणून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली. परंतु राज ठाकरे यांच्या इशाऱ्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी भोंगे वाजवण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर सरकार असलेल्या शिवसेनेने याचे श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या याबाबत शिवसेनेकडून एक पोस्ट व्हायरल केली जात असून शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेमध्ये व्हायरल केली जात आहे.

व्हायरल पोस्ट अशी

करेक्ट कार्यक्रम याला म्हणतात!

खरंच शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना मानले पाहिजे!

होय मानलेच पाहिजे आणि याचे कारण असे की, मागील अडीज वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारला पाडण्यासाठी लगातार प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जेव्हा सातत्याने अपयश आले आणि सरकार काही केल्या पडत नसल्याचे लक्षात आल्यावर तातडीने भाजपने मनसेला हाताशी धरत हिंदू मुस्लिम भोंग्यांचा वाद उकरत महाराष्ट्रात दंगली घडतील असे चित्र निर्माण केले.

जेणेकरून दंगली झाल्या की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून ठाकरे सरकार पाडण्याचा हा डाव होता. परंतु शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी परिस्थीचे गांभीर्य ओळखून, दंगली घडवू पाहणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजाला शांततेचे आवाहन केले.

कमाल बघा, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काहींचे मनसुबे मुस्लिम समाजाने सामंजसाने ऊधळुन लावले आणि या महाराष्ट्रद्रोहींना आपल्या कृतीतून चोख उत्तर दिले…आज मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी भोंगे वाजलेच नाही पण दंगल देखील झाली नाही!

त्यामुळे भोंगे हे तर सोंग होते पण खरा मनसुबा तर दंगली घडविणे हा होता आणि तो मनसुबा पुरता फसला इतके मात्र नक्की! म्हणूनच बोलतो मित्रांनो, शांत व्यक्तीला कधीही कमजोर समजू नका आणि त्यात जर त्या व्यक्तीचे नाव श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल तर मग विषयच संपला.

After the ultimatum, the horns on most of the mosques were lowered

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात