सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर प्रवीण दरेकर म्हणतात- ईश्वरी संकेतही भाजपच्या बाजूने आहेत!


अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने 19 पैकी ११ जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावे लागले. 2008 ते 2019 अशी तब्बल ११ वर्षे राणेंच्या ताब्यात असलेली ही बँक 2019 मध्ये शिवसेनेकडे गेली होती. परंतु राणेंनी संपूर्ण ताकद पणाला लावून अखेर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ईश्वरी संकेत भाजपच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे. After BJPs victory in Sindhudurg District Bank election Praveen Darekar says- God is also on BJPs side


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने 19 पैकी ११ जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावे लागले. 2008 ते 2019 अशी तब्बल ११ वर्षे राणेंच्या ताब्यात असलेली ही बँक 2019 मध्ये शिवसेनेकडे गेली होती. परंतु राणेंनी संपूर्ण ताकद पणाला लावून अखेर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ईश्वरी संकेत भाजपच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.

ईश्वरी संकेत भाजपच्या बाजूने – प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर म्हणाले की, नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर जबरदस्ती करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याला चोख उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने दिलं आहे. ईश्वरी संकेतही भाजपच्या बाजूने आहेत. जनता आमच्या सोबत आहे आणि ईश्वराचे पाठबळ आमच्या सोबत आहे. कितीही यंत्रणा आणि पोलीस वापरले तरी जनतेच्या दरबारात न्याय मिळतो, असंही ते म्हणाले.

भाजप कार्यकर्ता ”अरे ला, का रे” करायला घाबरणार नाही – प्रसाद लाड

https://twitter.com/PrasadLadInd/status/1476809283316723712?s=20

सायन माटुंगामध्ये नितेश राणेंविषयी आक्षेपार्ह पोस्टर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की, नितेश राणे यांचे पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कितीही पोस्टर लावले तरी आम्हला फरक पडत नाही. नितेश राणे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. उच्च न्यायालय आज त्याचा निर्णय देईल. नितेश राणेंना बेल मिळेल अशी खात्री आहे. नितेश राणेंवर खोटे गुन्हे टाकून बँकेची निवडणूक जिंकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. पण सिंधुदूर्गची जनता आजही राणेंच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीवर त्यांचा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचा निकाल आला आहे. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात जल्लोष साजरा होत आहे. राणे कुटुंबाचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.

आशिष शेलार यांचं ट्वीट – आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…

आपल्या ट्वीटमध्ये शेलार म्हणतात की, “देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो… नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!”

नितेश राणे अज्ञातवासात

आतापर्यंत जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीच्या पॅनेलची सत्ता होती. संतोष परब हल्ला प्रकरण आणि प्रचंड आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आता हायकोर्टात अर्ज करणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच नितेश राणे हे अज्ञातवासात आहेत.

981 पैकी 968 मतदारांनी केले मतदान

गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले. याचार्च अर्थ या निवडणुकीत तब्बल 98.67 टक्के मतदान झालंय. या मतदारांमध्ये 115 महिला, तर 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. मतदान प्रकिया ही शांततेत पार पडली.

जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष पराभूत

जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं पडली. यानंतर ईश्वर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन होते. गतवर्षी बिनविरोध आलेले सतीश सावंत पराभूत झाल्यानं महाविकास आघाडी जबर हादरा बसला आहे. सावंत पराभूत होताच भाजपकडून जारेदार घोषणाबाजी करण्यात आली. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

After BJPs victory in Sindhudurg District Bank election Praveen Darekar says- God is also on BJPs side

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात