वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एसआयटी चौकशीला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली त्यापाठोपाठ परमवीर सिंग यांना देखील दणका दिला आहे.After Anil Deshmukh, Paramvir Singh was also slapped by the Supreme Court
तुम्हाला अटकेपासून संरक्षण द्यायचे की नाही ते नंतर पाहू. परंतु तुम्ही देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात नेमके कुठे आहात?, हे पहिल्यांदा सांगा!!, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंग यांना फटकारले आहे.
Supreme Court asks the lawyer of Param Bir Singh to inform his whereabouts. Court posts the matter for hearing on Monday, 22nd November. — ANI (@ANI) November 18, 2021
Supreme Court asks the lawyer of Param Bir Singh to inform his whereabouts. Court posts the matter for hearing on Monday, 22nd November.
— ANI (@ANI) November 18, 2021
परमवीर सिंग यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात अटकेपासून संरक्षणाची याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंगांच्या ठावठिकाण्यावरून त्यांच्या वकिलांना सुनावले आहे. आधी परमवीर सिंग यांनी कोर्टात आपण नेमके कोठे आहोत हे सांगावे. देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात ते कुठे आहेत? याची माहिती द्यावी. मग त्यांच्या याचिकेवर काय निर्णय घ्यायचा? त्यांना अटकेपासून संरक्षण द्यायचे की काय करायचे?, हे पाहू, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे अनिल देशमुख आणि परमवीर सिंग या दोघांच्याही प्रकरणांमध्ये बाहेर कितीही आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळ सुरू असला तरी सुप्रिम कोर्टाने मात्र दोघांनाही कायद्याच्या लाईनीत एकाच कसोटीवर तोलत निकाल दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App