मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांची एसआयटी चौकशी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी रोखण्याचा अनिल देशमुख यांचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे.Supreme Court refuses to entertain a plea of ex-Maharashtra HM Anil Deshmukh, seeking direction to the investigating agencies to place the records of preliminary inquiry for court’s examination

अनिल देशमुख यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातली चौकशी केंद्रीय तपास संस्थांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे करू नये, त्या चौकशीचे रेकॉर्ड सुप्रीम कोर्टासमोर ठेवावेत, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. परंतु या याचिकेची दखल घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असून अनिल देशमुख यांना या संदर्भातली तक्रार खालच्या योग्य त्या कोर्टात करण्याची मुभा दिली आहे.

त्यामुळे आपल्या विरुद्धची केंद्रीय तपास संस्थांची चौकशी रोखण्यात अनिल देशमुख यांना एक प्रकारे अपयश आल्याचे मानले जात आहे. सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली. त्यांना त्यांची तक्रार घेऊन कनिष्ठ स्तरीय कोर्टात जाण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरुद्धची मनी लॉन्ड्रिंग केसची चौकशी केंद्रीय तपास संस्था करतील. अनिल देशमुख यांनी कनिष्ठ स्तरीय कोर्टातून त्या प्रकारची ऑर्डर आणल्याशिवाय ती थांबणार नाही.

Supreme Court refuses to entertain a plea of ex-Maharashtra HM Anil Deshmukh, seeking direction to the investigating agencies to place the records of preliminary inquiry for court’s examination

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात