अदर पूनावाला देशसेवा करत आहेत ; ते सुरक्षित भारतात येतील याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी ! उच्च न्यायालयाचे आदेश


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.यानंतर ते लंडनला गेले आणि तेथूनच आपल्या कंपनीचे काम पहात आहेत.


पूनावाला यांच्याशी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःहून बोलण्याची गरज आहे..त्यांना सुरक्षा द्या! Adar Poonawalla’s safety on his return must be ensured: Bombay HC tells Maharashtra Govt


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ अदर पूनावाला हे देशसेवा करत आहेत त्यांना मिळणार्या धमकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पूनावाला यांना आवश्यक सुरक्षा देण्याचे आश्वासन द्यावे .त्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश देत राज्य सरकारच्या उच्च अधिकार्यांनी त्यांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे असे देखील उच्च न्यायालयाने म्हण्टले आहे .

लसीचा पुरवठा व्हावा म्हणून मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षित भारतात येतील याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी आपल्याला लसीचा पुरवठ्यावरुन धमकीचे फोन आणि दबाव येत असल्याचं सांगितलं होतं.

अशा वातावरणात आपल्याला सध्या भारतात राहणं योग्य वाटत नसल्याचंही पूनावाला म्हणाले होते. उच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बेंचसमोर पूनावालांच्या सुरक्षेसंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी झाली. “लसची निर्मिती करुन पुनावाला हे चांगल्या रितीने देशसेवा करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्वोच्च सुरक्षा यंत्रणांनी त्यांना भारतात सुरक्षित पद्धतीने आणून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे”, असे आदेश जस्टीस एस.एस.शिंदे आणि जस्टीस अभय अहुजा यांच्या खंडपीठाने दिले.



दत्ता माने या वकीलाने अदर पूनावाला यांना Z + सुरक्षा मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करत असताना खंडपीठाने राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी यासंबंधी पूनावाला यांच्याशी स्वतः संवाद साधायला हवा. केंद्र सरकारने याआधीच पूनावाला यांना Y दर्जाची सूरक्षाव्यवस्था पुरवली आहे. काही राजकारणी पूनावाला यांच्याकडे लसीच्या पुरवठ्यावरुन सारखा तगादा लावत आहेत. याच दबावसत्रामुळे अदर पूनावाला भारत सोडून लंडनला गेल्याचं दत्ता माने यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारकडून बाजू मांडताना वकीलांनी पूनावाला यांना आधीच Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवान आणि राज्य पोलीस दलातील दोन बंदुकधारी जवान पूनावाला यांच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात आहेत. सध्याच्या परिस्थिती पाहता पूनावाला जेव्हा भारतात परततील तेव्हा त्यांना Z + सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचा राज्य सरकार आढावा घेत असल्याचं सांगितलं.

सरकारी पक्षाने मांडलेल्या बाजूनंतर खंडपीठाने आपली भूमिका मांडत सरकारमधील उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पुनावाला यांच्याशी बोलणं गरजेचं आहे असं सांगितलं.

“मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं. जर पूनावाला यांचा कशाची काळजी वाटत असेल तर सरकारने त्यांच्याशी बोलायला हवं. ते ज्यावेळी महाराष्ट्रात परततील त्यावेळी सरकारने त्यांच्याशी बोलून त्यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था करायला हवी.”

Adar Poonawalla’s safety on his return must be ensured: Bombay HC tells Maharashtra Govt

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात