ऊसाच्या फडात पाचोळ्याला लागली आग; अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू


नंदिनिला ताबडतोब कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. A fire broke out in a sugarcane field; Eleven-month-old girl’s unfortunate death


विशेष प्रतिनिधी

कराड : ऊसाच्या फडात पाचोळ्याला आग लागल्यामुळे झोळीत झोपवलेल्या अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन मृत्यू झाला.नंदिनी सोमय्या वरवी (रा.निलपाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे भाजून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना बनवडी (ता. कराड) येथे घडली.

नेमकी घटना काय घडली ?

सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात दाखल झाली आहे.दरम्यान मंगळवारी गावातील एका शेतकऱ्याच्या ऊसाची तोडणी करण्यासाठी ऊसतोड मजूर गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना अकरा महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. ऊसतोडणी सुरू असताना सोमय्या यांच्या पत्नीने झोळी बांधली.



त्या झोळीत नंदिनीला झोपवले आणि त्या ऊस तोडण्यासाठी पुन्हा फडात आल्या.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नंदिनीला ज्याठिकाणी झोळीत ठेवले होते,तेथील पाचोळ्याला आग लागली.आग लागल्याचे मजुरांच्या निदर्शनास आल्यास मजुरांनी त्याठिकाणी धाव घेऊन पाचोळा विझविला. मात्र, या आगीत अकरा महिन्यांची नंदिनी भाजून गंभीर जखमी झाली.

नंदिनिला ताबडतोब कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. हवालदार देशमुख तपास करीत आहेत.

A fire broke out in a sugarcane field; Eleven-month-old girl’s unfortunate death

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात