७५वा स्वातंत्र्यदिन ; मंत्रालयात धजारोहणानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाषण


  • राज्यातील सर्व नागरिकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
  • परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं
  • शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले
  • राज्यातील राष्ट्रपती पदके प्राप्त पोलिसांचे तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
  • कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत.
  • गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला,
  • शिथिलता आणत असलो तरी आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे,

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आज आहे. संपूर्ण देशवासीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. परंपरेनुसार मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे,75th Independence Day: Speech of Chief Minister Thackeray after flag hoisting at the Ministry

तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन, महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला.



मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल.

75th Independence Day: Speech of Chief Minister Thackeray after flag hoisting at the Ministry

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात