WATCH : औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाईंना MIM ने दाखवले काळे झेंडे


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : देशभरात 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी आले होते. यावेळी पालकमंत्र्यांना एमआयएमतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. MIM shows black flags to Guardian Minister Subhash Desai in Aurangabad

खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शेकडो एमआयएम कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून पालकमंत्र्यांच्या ताफ्याला वाट करून दिली.

  • औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवल्याचा आरोप
  • स्वातंत्र्यदिनी एमआयएमने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखवले काळे झेंडे
  • खा. इम्तियाज जलील शेकडो एमआयएम कार्यकर्त्यांचे आंदोलन
  • पोलिसांनी हस्तक्षेप करून पालकमंत्र्याच्या ताफ्याला करून दिली वाट

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था