महाराष्ट्रात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 287 पैकी 283 आमदारांनी केले मतदान

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या 287 पैकी 283 आमदारांनी सोमवारी (दि. 18) मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, नवाब मलिक हे चार आमदार मतदानाला उपस्थित नव्हते. प्रकृती ठीक नसतानाही भाजपच्या मुक्ता टिळक यांनी विधानभवनात येऊन मतदान केले.283 out of 287 MLAs voted in the presidential election in Maharashtra

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांनी आव्हान दिले आहे. महाराष्ट्रातून भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 आमदारांची मते मिळवून देण्याचा शिंदे सरकारचा निर्धार आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलैला होणार आहे. त्यामुळे मतमोजणीविषयी उत्सुकता आहे.राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 283 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

283 out of 287 MLAs voted in the presidential election in Maharashtra

महत्वाच्या बातम्या