Weather Alert : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, येत्या 24 तासांत 24 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : दोन दिवसांच्या दिलाशानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट आणि 2 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाबाबत हवामान खात्याने पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.Weather Alert Heavy rain again in next three days in Maharashtra, alert warning in 24 districts in next 24 hours

हवामान खात्याचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून पावसाबाबतच्या सतर्कतेची माहिती दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यापैकी पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.



पुढील 24 तासांसाठी गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय ज्या 22 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे त्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती यांचा समावेश आहे. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याचे ट्विट, येत्या 24 तासांत पडेल मुसळधार पाऊस

दोन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत यलो अलर्ट

पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडेल. गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट राहणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सोमवारीही यलो अलर्ट कायम राहणार आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुराने कहर केला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भात पूरस्थिती आहे. गडचिरोली, नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली. पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत १०२ हून अधिक मृत्यू झाले आहेत. अनेक गावांचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यभरात 14 NDRF आणि 5 SDRF च्या टीम बचाव कार्यात गुंतल्या आहेत. पूरग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Weather Alert Heavy rain again in next three days in Maharashtra, alert warning in 24 districts in next 24 hours

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात