अमेरिकेच्या मॉलमध्ये गोळीबार : 3 ठार, 2 जखमी; सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराला केले ठार


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एका मॉलमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराची हत्या केली आहे. सध्या गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही.US mall shooting 3 dead, 2 injured; An armed citizen killed the assailant

सशस्त्र नागरिकाने हल्लेखोरावर गोळीबार केला

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये घडली. ग्रीनवुड पोलिस विभागाचे प्रमुख जिम इसन म्हणाले – एक अज्ञात व्यक्ती मॉलच्या फूड कोर्टमध्ये घुसला. त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर मॉलमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका नागरिकाने हल्लेखोरावर गोळीबार केला. त्यामुळे हल्लेखोराचा मृत्यू झाला.संशयास्पद बॅगही सापडली

इसन म्हणाले- मॉल इंडियानापोलिसपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. 130 हून अधिक इनडोअर आणि आउटडोअर रेस्टॉरंट्स आणि दुकाने आहेत. या गोळीबारात एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते म्हणाले- आम्हाला फूड कोर्टजवळील टॉयलेटमधून एक संशयास्पद बॅगही सापडली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

US mall shooting 3 dead, 2 injured; An armed citizen killed the assailant

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात