Margaret Alva Profile : काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा केला होता आरोप; राजस्थानसह चार राज्यांच्या राहिल्या राज्यपाल


प्रतिनिधी

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रविवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. 80 वर्षीय अल्वा मूळचा मंगळुरू, कर्नाटकच्या आहेत. त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांच्याशी होणार आहे.Margaret Alva Profile : Once the Congress High Command was accused of selling tickets; Remained Governor of four states including Rajasthan

राजीव-नरसिंह यांच्या सरकारमध्ये होत्या कॅबिनेट मंत्री

मार्गारेट अल्वा या राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. राजीव मंत्रिमंडळात अल्वा संसदीय कामकाज आणि युवा विभागाच्या मंत्री होत्या, तर राव यांच्या सरकारमध्ये त्या सार्वजनिक आणि निवृत्तिवेतन खात्याच्या मंत्री होत्या.



काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा आरोप

2008 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान अल्वा यांनी काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा आरोप केला होता, त्यानंतर त्यांना काँग्रेसने सरचिटणीस पदावरून हटवले होते. अल्वा तेव्हा महाराष्ट्र, मिझोराम आणि पंजाब-हरियाणाच्या प्रभारी होत्या. मात्र, गांधी घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना उत्तराखंडला राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले.

शाह बानो प्रकरण आणि राजीव गांधी यांच्याबद्दल केला खुलासा

2016 मध्ये अल्वा यांनी त्यांची बायोग्राफी करेज अँड कमिटमेंटमध्ये खुलासा केला. त्यांनी लिहिले की, जेव्हा राजीव गांधी शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात अध्यादेश आणणार होते, तेव्हा मी त्यांना मौलवींपुढे न झुकण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी माझी सूचना मान्य करण्यास नकार दिला.

गुजरात-राजस्थानसह 4 राज्यांच्या राहिल्या राज्यपाल

अल्वा या गुजरात, राजस्थान, गोवा आणि उत्तराखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. त्या उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. 2009 ते 2012 या काळात त्यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय 2012 ते 2014 या काळात त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. याचवेळी त्यांच्याकडे गुजरात आणि गोव्याची जबाबदारीही आली.

धर्मांतर विधेयकावरून भाजप सरकारविरोधात जोरदार टीका

पाच वेळा खासदार राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांनी गेल्या वर्षी भाजपच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारच्या धर्मांतरविरोधी विधेयकावर टीका केली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, “मला अनेकदा भाजप खासदार आणि आमदारांचे मिशनरी शाळा आणि महाविद्यालयातील जागांसाठी फोन येतात. जर आम्ही त्यांचे धर्मांतर केले तर ते त्यांच्या मुलांना ख्रिश्चन शाळांमध्ये का पाठवतात?

त्या म्हणाल्या होत्या- ख्रिश्चन सत्तेने भारतावर 200 वर्षे राज्य केले. ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच येथे होते. आज आपण देशाच्या लोकसंख्येच्या जेमतेम 3 टक्के आहोत. जर आम्ही धर्मांतर केले असते तर आम्ही किमान 30 टक्के असायला हवे होते.

भाजपचे उमेदवार जगदीप धनखड यांच्याशी होणार स्पर्धा

अल्वा यांचा सामना भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांच्याशी होणार आहे. धनखड हे सध्या बंगालचे राज्यपाल आहेत. 70 वर्षीय जगदीप धनखड यांची 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बंगालचे 28 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. ते 1989 ते 1991 या काळात राजस्थानच्या झुंझुनू येथून लोकसभेचे खासदार होते. 1989 ते 1991 या काळात ते व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होते.

Margaret Alva Profile : Once the Congress High Command was accused of selling tickets; Remained Governor of four states including Rajasthan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात