विशेष प्रतिनिधी
मुंबई : १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी फादर (ख्रिस्ती धर्मगुरु) जॉन्सन लॉरेन्स यांना विशेष पॉक्सो न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो न्यायालयाने २९ डिसेंबर या दिवशीच्या सुनावणीत हा निर्णय दिला. वर्षे २०१५ च्या डिसेंबरमध्ये जॉन्सन लॉरेन्स यांना संबंधित मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. 2015-Father finally sentenced to hard labor for sexually abusing a minor in church; Special Sessions Court verdict in Mumbai Sessions Court
पीडित मुलगा हा वर्षे २०१५ मध्ये चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी जात होता. त्या काळात आरोपी जॉन्सन लॉरेन्स यांनी प्रार्थनेनंतर सर्वजण गेल्यानंतर अनेकदा त्याला एकट्याला थांबवून अनैसर्गिक अत्याचार केले होते. पीडित मुलगा हा गरीब कुटुंबातील होता. चर्चमधून मिळणार्या साहाय्यावर परिणाम होईल या भीतीने त्याने या अत्याचाराची कुणालाही लगेच माहिती दिली नाही,मात्र हळूहळू त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊ लागला.
आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात भरती करावे लागले. रुग्णालयातून आल्यानंतर पुन्हा जॉन्सन लॉरेन्स यांनी त्याच्यावर अत्याचार चालू केले. अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलाने त्याच्या आईला सर्व सांगितले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App