कमला इमारत आग दुर्घटनेत 18 जण जखमी , जखमींवर उपचार न केल्याने महापौर संतापल्या


आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन व 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.18 injured in Kamala building fire accident, mayor angry over non-treatment of injured


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. ही इमारत 20 मजली इमारत असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागलीय.आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन व 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.

ही माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने माहिती दिली आहे.दरम्यान,या आगीत होरपळलेल्या जखमींवर मुंबईतील 2 नामांकित रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.



आग दुर्घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यापैकी 3 जण अत्यवस्थ आहेत.जखमींना वाचवल्या नंतर वॉक्हार्ट आणि रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेले असता.

या दोन्ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे भाटिया रुग्णालयातच या जखमींना दाखल करावं लागलंय.त्यामुळे नकार देणाऱ्या या दोन्ही रुग्णालयावर कारवाई करण्यास आयुक्तांना आपण सांगणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

18 injured in Kamala building fire accident, mayor angry over non-treatment of injured

महत्त्वाच्या बातम्या

Goa Elections : उत्पल पर्रीकर अपक्ष लढण्यावर संजय राऊत म्हणाले – पणजीतील लढाई आता बेईमान आणि चारित्र्यवान यांच्यात होणार!

बिक्रम मजिठियांचा मोठा आरोप : मुख्यमंत्री चन्नी यांचा कोट्यवधींचा घोटाळा; लुटीचा पैसा काँग्रेस हायकमांडकडे गेला; 300 कोटींचा घोटाळा

मायावतींचे भाजपच्या पावलावर पाऊल; हर बूथ जितना है, बसपा को सत्ता में लाना है!!

महिला सफाई कर्मचारीने दिले चुकीचे इंजेक्शन; दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू; चारही आरोपी पळाले

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात