महिला सफाई कर्मचारीने दिले चुकीचे इंजेक्शन; दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू; चारही आरोपी पळाले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महिला सफाई कर्मचारीने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. Incorrect injection given by female janitor; The death of a two-year-old boy; All four accused fled

ताह आजम खान असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या दोन वर्ष्याच्या चिमुरड्याला नर्सिंग होमधील १६ वर्षांच्या सफाईकाम करणाऱ्या मुलीने इंजेक्शन दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अल्ताफ अब्दुल हसन खान, व्यवस्थापक नसिमुद्दीन साय्यद, परिचारिका सलीम ऊंनीसा खान आणि त्या अल्पवयीन सफाई कर्मचारी मुलीवर गुन्हा नोंदविला आहे.ताह खान याला उलट्या, जुलाबांचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी जवळच्याच नूर रुग्णालयमध्ये ११ जानेवारीला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिसचार्ज देत असताना रुग्णालयातील नर्सने सफाई काम करणाऱ्या मुलीला १६ वर्षांच्या रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. पण, या मुलीने ते इंजेक्शन दोन वर्षांच्या ताह याला दिले.

एक इंजेक्शन सलाइनमधून दिले तर दुसरे थेट टोचले. काही वेळातच ताह याचा मृत्यू झाला. मुलाला दिलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि पोलिसांनी तपास केला असता असता त्यात हलगर्जीपणा समोर आल्याने शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे चारही आरोपी सध्या फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र हे रुग्णालय अजून ही सुरूच आहे. या प्रकरणी मृत मुलाचा वडिलांनी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलिस या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजन यांनी दिली आहे.

Incorrect injection given by female janitor; The death of a two-year-old boy; All four accused fled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था