मायावतींचे भाजपच्या पावलावर पाऊल; हर बूथ जितना है, बसपा को सत्ता में लाना है!!


वृत्तसंस्था

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राजकीय दृष्ट्या भाजपच्या पावलावर पाऊल टाकले आहे. भाजपने जशी बूथ केंद्रित रणनीती आखून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 2017 मध्ये यश मिळवले होते त्याच पद्धतीने मायावती आता आपल्या कार्यकर्त्यांची रचना करताना दिसत आहेत.I hope party workers will work hard & will form BSP govt like of 2007: BSP chief Mayawati

मायावतींनी आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 51 उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा त्यांनी बहुजन समाज पक्षाची रणनीती देखील स्पष्ट केली. मायावती म्हणाल्या, की बहुजन समाज पक्षाने प्रत्येक बूथ वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पक्षाने नवी घोषणा दिली आहे, “हर बूथ जितना है, बसपा को सत्ता मे लाना है” बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील यासाठी प्रचार करतील आणि त्यातून 2007 मध्ये जसे बहुजन समाज पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले तसा विजय 2022 च्या विधानसभा निवडणुकीत साकारण्यात येईल.

मायावतींनी जी बूथ केंद्रित रणनीती सध्या अवलंबले आहे तीच रणनीती भाजपने 2017 मध्ये अवलंबली होती. त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील हीच भाजपची रणनीती होती. भाजपने देखील बोध केंद्रित रणनीती स्वीकारून आपला विजय साकार केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक बुथवर भाजप आणि बहुजन समाज पक्ष यांचा राजकीय संघर्ष दिसून येईल.

I hope party workers will work hard & will form BSP govt like of 2007: BSP chief Mayawati

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती