वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक स्वाती ढुमणे मृत्यूमुखी , कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत , पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येणार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा


वाघाच्या या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.Forest ranger Swati Dhumane dies in tiger attack, Rs 15 lakh assistance to family members Chief Minister’s announcement


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.वाघाच्या या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.

तसेच मृत स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.



नेमकी घटना काय घडली

स्वाती ढुमणे व्याघ्र गणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.९७ येथे पोहचल्या.त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला .स्वाती ढुमणे यांच्यासोबत ४ वनमजूर होते.त्यांनी वाघाला हुस्कवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वघान स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.

यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.त्यांनी आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान स्वाती यांचा मृतदेह घनदाट जंगलात आढळला.सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे.

Forest ranger Swati Dhumane dies in tiger attack, Rs 15 lakh assistance to family members Chief Minister’s announcement

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात