प्रतिनिधी
मुंबई : वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथ यांच्यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार दिला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत आणि विधानसभेबाहेर लगावला. World chess champion Viswanathan Anand refuses to play chess with Amit Shah
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाची भाषणे सभागृहात सुरू असताना छगन भुजबळ मध्ये उठले आणि म्हणाले, की मला एक मेसेज आला आहे की वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथन यांच्यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूने देखील अमित शहा यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार दिला आहे. कारण अमित शहा असे काही मोहरे फिरवतात, अशा चाली खेळतात की त्याच्यापुढे बाकीचे सगळेच मोहरे गारद होतात. त्यामुळे विश्वनाथन आनंद याच्यासारख्या जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूने त्यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार दिला आहे, असा टोला भुजबळ यांनी लगावला.
विधानसभा सभागृहात राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले आदी नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळाली. या नेत्यांनी एकमेकांना शाब्दिक चिमटे काढून घेतले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपद गमावल्याचे दुःख
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराची चुणूक आजच्या सदनाच्या कामकाजातही दिसून आली. जनतेचा कौल नसताना आणलेल्या आधीच्या ठाकरे पवार सरकारमध्ये जी आयती मंत्रिपदे मिळाली होती ती गमावल्याचे दुःख आणि खंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसली. देवेंद्र फडणवीस यांनी नूतन विधानसभा अध्यक्ष नाना पाटी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना आधीचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आभार मानले. कारण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची संधी शिंदे फडणवीस सरकारला मिळाला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App