मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये ३२ मीटर खोल बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामाला सुरुवात, २०२८ पर्यंत होणार पूर्ण


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचे हे  काम बीकेसीमधील ४.८ हेक्टर जागेवर होत आहे. 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स  अर्थात बीकेसी येथे ३२ मीटर खोल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामाला सुरूवात झालेली असून, २०२८ पर्यंत हे टर्मिनस  तयार होणार आहे. बॉटम-अप  पद्धतीनुसार जवळपास ४.८ हेक्टर क्षेत्रावर हे भूमिगत टर्मिनसचे काम केले जात आहे. Work on 32 metre deep bullet train terminus at BKC in Mumbai to be completed by 2028

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसच्या या कामासाठी  मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी या दोघांना कंत्राट  दिलेलं आहे. हे स्टेशन बॉटम-अप पध्दतीने बांधले जाईल, म्हणजे जमिनीपासून खोदकाम सुरू होईल आणि पायापासून काँक्रीटचे काम सुरू होईल. ५५९ कामगार आणि सुपरवाझर हे दिवसा आणि रात्री कामावर असणार आहेत. ३२ मीटर खोल राहणार असून १८ लाख घन मीटर माती खोदली जाणार आहे.

अंदाजानुसार,  बांधकाम  झपाट्याने सुरू झाल्यानंतर   दरम्यान दररोज जास्तीत जास्त सहा हजार व्यक्तींची कामगारांची आवश्यकता असू शकते.  असे खोल उत्खननाचे काम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आणि कामा दरम्यान माती कोसळून दुर्घटना टाळण्यासाठी ग्राउंड सपोर्ट सिस्टम तयार करणे आवश्यक आहे.

स्टेशनमध्ये सहा प्लॅटफॉर्म असतील आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी ४१५ मीटर असेल. या लांबीवर १६ डब्यांची बुलेट ट्रेन सहज थांबवता येते. हे स्थानक मेट्रो आणि रस्त्यानेही जोडले जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरवर बांधण्यात येणारे हे एकमेव भूमिगत स्टेशन असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम पुन्हा सुरू झाले आहे. राजकीय गोंधळात ही योजना ठप्प झाली होती. यापूर्वीच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी टर्मिनसच्ा मार्गात येणारे अडथळे दूर करण्याची घोषणा केली होती.

Work on 32 metre deep bullet train terminus at BKC in Mumbai to be completed by 2028

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात