विशेष प्रतिनिधी
पुणे : झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमाचे हे तिसरं पर्व असून, या परवा मध्ये अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून झाली असून , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, संजय राऊत, खासदार अमोल कोल्हे, तर कला क्षेत्रातील सुबोध भावे वंदना गुप्ते सई ताम्हणकर अमृता खानविलकर श्रेयस तळपदे या दिग्गजांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. Supriya Sule in Khupte thithe Gupte show
या वेळच्या भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत.यावेळी असा क्षण आला जिथे सुप्रियाताई भावुक झालेल्या दिसल्या. खुपते तिथे गुप्तेच्या नवीन सीझनमध्ये हा भावुक क्षण सर्वांना अनुभवता आला. काय घडलं बघूया.आणि अजितदादांचा फोटो पाहून सुप्रियाताईंच्या डोळ्यात आलं पाणी खुपते तिथे गुप्ते शोचा नवीन प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत मंचावर सुप्रिया सुळेंची एन्ट्री होते.
View this post on Instagram A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
एकवेळ कुटुंबाताल माणसं साथ सोडतील, पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत, अशी ओळ मागे ऐकायला येते. सुप्रिया सुळेंना अजितदादांचा फोटो दाखवण्यात येतो. यावेळी दादांचा फोटो पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी येतं. हे बघून अवधूत गुप्ते म्हणतात, “तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला म्हणाला होता, की मी कोणासमोर भावना उघड करु शकत नाही. पण आता…!” एकुणच अजितदादांनी बंड केल्यावर खुपते तिथे गुप्ते निमित्ताने सुप्रियाताई पहिल्यांदाच व्यक्त झालेल्या दिसल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App