विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे बऱ्याच दिवसांनी बोलल्या आम आदमी पार्टी आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला चोर म्हटल्याबद्दल त्या दोन्ही पक्षांवर लोकसभेत घसरल्या. Supriya Sule spoke after a long time
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात केंद्र सरकारने विशिष्ट विधेयक मांडल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाची भूमिका लोकसभेत मांडली. त्यावेळी त्यांनी आम आदमी पार्टी आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. या दोन्ही पक्षांनी आम्हाला चोर म्हटले होते. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवार अजूनही सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे का देत नाहीत??; त्यांना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी रामाराव आठवतात का??
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. त्याचवेळी आज आम्ही आम आदमी पार्टीला साथ देत असलो तरी आम आदमी पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसला चोर म्हटले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. भाजपने माझ्याविरुद्ध प्रचार करताना बारामतीत येऊन राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून हिणवले होते. पण त्यांनी तरी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची देण्याचे आश्वासन पाळले का?? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजित निष्ठा असे दोन गट पडल्यानंतर सुप्रिया सुळे बरेच दिवस गप्पा होत्या. जाहीररित्या त्या काही बोलायला तयार नव्हत्या. आज सुद्धा लोकसभेत दिल्ली संदर्भातील विधेयकावर त्या बोलल्या पण राष्ट्रवादीतल्या फुटी संदर्भात त्यांनी बोलायचे टाळले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more