भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाकडून नवी संघटनात्मक जबाबदारी


महाविजय २०२४’ या या साठीचीं तयारी सुरु

विशेष प्रतिनिधी

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले. Mulrlidhar mohol BJP mission mahavijay 2024.


मेट्रोला “अर्धवट” म्हणणाऱ्यांना पुणेकरांनीच हाणली चपराक; महापौर मुरलीधर मोहोळांचा शरद पवारांना टोला!!


 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे महत्वाकांक्षी अभियान असलेल्या ‘महाविजय २०२४’ साठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद देत त्या अंतर्गत येणाऱ्या कोथरुड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचे ‘महाविजय २०२४’चे समन्वयकपद म्हणूनही मोहोळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणूनही मोहोळ हेच काम पाहणार आहेत.

Mulrlidhar mohol BJP mission mahavijay 2024.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात