बारामती सोडून इतरत्र उभे राहायचे धाडसही होत नाही; विजय वडेट्टीवारांच्या कौतुकातून अजितदादांची कबुली!!


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसने ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विधानसभेत त्यांच्या नेतृत्व कौशल्याची वाखाणणी करणारी भाषणे केली. त्यावेळी वडेट्टीवारांच्या राजकीय धाडसाचे कौतुक करताना अजित पवारांनी स्वतःमध्ये विशिष्ट धाडस नसल्याची कबुली देऊन टाकली. Not even daring to stand anywhere else except Baramati

अजित पवार म्हणाले, विजय वडेट्टीवार गेली 25 वर्षे विधिमंडळात आहेत. 1998 मध्ये शिवसेनेने त्यांना विधान परिषदेत येण्याची संधी दिली. पण त्यानंतर काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी विधानसभा निवडणुका लढवत विजय मिळवले. सुरुवातीला त्यांनी चिमूर मतदार संघातून विजय मिळवला, तर त्यानंतर 2014 मध्ये ब्रह्मपुरी मतदार संघ निवडून तेथूनही विजय वडेट्टीवार निवडून आले.


‘’अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्याचे का कळवले नाही?’’; शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल!


पश्चिम महाराष्ट्रात मतदार संघ बदलणे आम्हाला सोपे वाटत नाही. मी बारामती मतदारसंघातून एक नंबरने निवडून येतो. पण शेजारच्या मतदारसंघात देखील उभे राहण्याचे माझे धाडस होत नाही. बाळासाहेब थोरात संगमनेर मधून अनेकदा निवडून येतात. पण शेजारच्या मतदारसंघाची त्यांना देखील खात्री वाटत नाही.

पण वडेट्टीवार मात्र मतदारसंघ बदलून निवडून आले, याविषयी अजित पवारांनी त्यांच्या कौतुक केले. पण या कौतुकात आपल्याला बारामती सोडून इतरत्र उभे राहण्याचे धाडस होत नाही, याची कबूलीही देऊन टाकली.

Not even daring to stand anywhere else except Baramati

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात