Rajendra Raut : मॅनेज न होता मराठा समाजासाठी काम करा, आमदार राजेंद्र राऊत यांचा जरांगेंवर हल्लाबोल

Rajendra Raut

विशेष प्रतिनिधी

बार्शी : मॅनेज न होता मराठा समाजासाठी काम करा. कोणाला एकाला टार्गेट करू नका. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सरकार आणायचे पाप जर तुमच्या मनामध्ये असेल तर त्यांच्याकडून लिहून घ्या.लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीला झुकत माप दिले आहे, असा हल्लाबोल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्यावर केला.

बार्शी तालुक्यातील मराठा समाजातील काही तरुणांनी जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले होते. यावरून जरांगे यांनी आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कडाक शब्दात टीका केली होती. त्याला उत्तर देताना आमदार राऊत म्हणाले, तुम्ही प्रामाणिकपणे करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा कोणी यांना टार्गेट करू नका. महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहेत



राऊत म्हणाले, तुम्ही नेमकं कोणाला शिव्या देत आहात. काय चाललं आहे? नीट विषय तरी समजून घ्या. ज्या मराठा समाजाने तुमचा मान-सन्मान केला, आदर केला,मराठ्यांचे आमदार,आजी-माजी मंत्री उगाच कोणाच्या वाट्याला जायचे म्हणून बिचारे गप्प बसतायत. तुमच्या शिव्या खातात.माझ्या आतड्याला इन्फेक्शन झाल्यामुळे मी आपणाला 4 ते 5 दिवस लेट भेटायला आलो. तेव्हा आपली भाषा बोलण्याची योग्य होती का आणि हा सुसंस्कृतपणा झाला का ? हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला शिकवलं आहे का ? या प्रश्नाचे उत्तर द्या.

आरक्षणाची गरज माझी बायको आणि आईबापाला माहिती आहे. मात्र माझी बायको आणि आईबापाने तुम्हाला काही बोलले आहेत का ? मग तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलता? बार्शी तालुक्यातील मराठ्यांची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील तर तुमच्या नाकाला झोंबलं असेल आणि माझ्या कुटुंबापर्यंत तुम्ही जात असाल तर ते योग्य नाही. मी ही छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. माझ्या घराण्याने ही छत्रपतींच्या गादीसाठी रक्त सांडले आहे

या तालुक्यात मराठा समाजासाठी मी पण रक्त सांडले आहे आणि जेलमध्ये गेलो आहे. आपणाला एवढी खुमखूमी जर असेल तर राजा राऊताच्या दारात सभा घेण्याची तर घ्या असे आव्हानही राऊत यांनी दिले.

राऊत म्हणाले, महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सरकार आणायचे हे पाप जर तुमच्या मनामध्ये असेल. लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीला झुकत माप दिले आहे. मग मराठा आरक्षणाबाबत त्यांच्याकडून लिहून घ्या. मग देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित दादा कसे लिहून देत नाहीत ते मी बघतो.ती माझी जबाबदारी आहे.जर या तिन्ही नेत्यांनी लिहून नाही दिलं तर आमदार राजेंद्र राऊतचा राजकीय सन्यास जाहीर करतो.जर या तिन्ही नेत्यांकडून लिहून नाही आणलं तर राऊत घराणं राजकारण सोडून मराठा बांधवांसाठी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करू. भले ही 10 – 20 एकर जामीन आणि इस्टेट गेली तरी चालेल

तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या,.माझ्या घरी चहापानाला या, भोसले चौकातून घरापर्यंत फुले अंठरती आणि पेढ्यांचा घास भरवतो.तुम्ही फक्त महाविकास आघडीच्या नेत्यांकडून लिहून आणा.तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा, मात्र जर या मराठ्यांच्या छाव्याला आणि छत्रपतीच्या मावळ्याला डिवचण्याचा प्रयत्न केला.खंडोजी खोपडेच्या भूमिकेत जाल तर राजा राऊत म्हणतात मला, काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्रात इतिहासात नोंद करेल, माझं डोकं फिरवू नका असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला. मी ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करेन त्या दिवशी पांडे चौकात फाशी घेईन. जरांगे फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात या, पेढा भरावेन,मात्र खंडोजी खोपडेचा रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावी लागेल, हे राजा राऊतचं चॅलेंज आहे, असेही ते म्हणाले.

कोण मराठ्यांचा माणूस बोलत नव्हता मात्र हा पठ्ठ्या राजा राऊत बोलत होता असे सांगून ते म्हणाले, किती तुकडे व्हायाचेत आणि किती तुकडे करायला लावायचे आहेत याच भान मला पण राहणार नाही. सभा उधळणे माझं काम नाही. इमानदारीने बार्शीत या. 50 लाख रुपये खर्चून पांडे चौकात तुमची घेण्याची जबाबदारी माझी आहे. बार्शीतल्या प्रत्येक घरातील मराठ्यांच्या बायामाणसासहित सभेला आणण्याची जबाबदारी माझी असेल. सभेची तारीख सांगा, सभेत खडा सुद्धा पडणार नाही, संरक्षण देण्याची ही या छत्रपतीच्या छाव्याची जबाबदारी. इथून पुढे तुम्ही उत्तर द्याचं. मग माझी 10-20 हजारांची सभा,तुम्ही हायत आणि मी हाय.

Work for the Maratha community without being managed, MLA Rajendra Raut attack Jarange

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात