विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातला कुठलाही विषय पुढे आला की तो देवेंद्र फडणवीसांना नेऊन भिडवा, या विरोधकांच्या प्रवृत्तीला फडणवीसांनी आज प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी एकत्र येऊन माझा अभिमन्यू करायचा ठरवला असला, तरी मला चक्रव्यूहात शिरायचे कसे आणि बाहेर पडायचे कसे??, हे मला चांगले समजते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. Devendra fadnavis says, he is modern abhimanyu
देवेंद्र फडणवीस रोजच टार्गेट
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत ही टीका तर संजय राऊत करत आहेत. तसंच बदलापूर आणि शिवपुतळा घटनेवरुनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. तसंच मनोज जरांगेही सातत्याने मनोज जरांगेंवर टीका करत आहेत. औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, महाराष्ट्रद्रोही, शिवरायांचे राज्य ज्यांनी घालविणाऱ्या पेशव्यांचे उत्तराधिकारी असंही संजय राऊत त्यांना म्हणाले. एकनाथ शिंदे से बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही, असे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी चिथावणी दिली.
Waqf Bill : वक्फ विधेयकावर जेपीसीच्या तिसऱ्या बैठकीत गदारोळ; विरोधी खासदार म्हणाले- मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत माहिती लपवली
या सगळ्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
संजय राऊत यांना जळी-स्थळी मीच दिसत असेन तर ठीक आहे. दिवसरात्र ते माझ्यावरच बोलतात. महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस काय आहेत ते माहिती आहेत. विरोधकांना वाटतं की माझी इमेज डॅमेज करुन त्यांना वाटत असेल काही जागा काढू शकतील तर ते शक्य होणार नाही. मला कितीही दूषणं दिली, कितीही शिव्या दिल्या तरीही माझ्या नावावर लागलेली जी कामं आहेत, जे व्हिजन महाराष्ट्राला दिलं आहे त्यात माझ्याशी ते बरोबरीच करु शकत नाहीत. वर्षानुवर्षे तुम्ही राज्य चालवलं सांगा तुम्ही काय केले? त्यांना उत्तरच देता येत नाही. मग मला अशा पद्धतीने टार्गेट केलं जाता. देवेंद्रवर रोज आरोप करा, रात्रंदिवस आरोप करा हे चालतं. माझ्याशी इतर कुठल्याही मुद्द्यावर स्पर्धा करता येत नाही. त्यामुळे मला वाटतं की ते मला किती मोठा नेता मानतात ते स्पष्ट होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माझा अभिमन्यू होणार नाही
देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला ही आनंदाची गोष्ट वाटते, यातून राजकारणातलं स्थान लक्षात येतं. तुम्हाला फक्त एका व्यक्तीवरच हल्ला करावासा वाटतो, शरद पवारही तेच करतात, काँग्रेसही तेच करते. मनोज जरांगे तर आहेतच. पण एकच गोष्ट सांगतो, विरोधकांना वाटतंय ते मला चक्रव्यूहात अडकवतील, मात्र त्यांना एकच सांगणार आहे की तुम्ही चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहिती आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहिती आहे. काहीही झालं तरीही माझा अभिमन्यू होणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more