विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तूपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्याअन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मात्र, त्यांनी आंदाेलन मागे घेण्यास नकार दिला आहे. सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा. मी शहीद व्हायला तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. Ravikant Tupkar insists on fasting despite his poor health
तूपकर यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी तपासणी करुन अन्नत्याग मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी व प्रशासनातील इतर अधिकारी देखील चर्चेसाठी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. या चर्चेदरम्यान त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
Vinesh Phogat-Bajrang Punia : विनेश फोगाट-बजरंग पुनियाचा आज काँग्रेस प्रवेश; जुलानामधून विनेशचे तिकीट निश्चित; बजरंगला प्रचाराची जबाबदारी
चर्चा सुरु असतांनाच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचाही फोन आला. त्यांनीही तुपकरांशी फोनवरुन चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आम्हाला तोंडी आश्वासन नको, मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय झाल्याशिवाय अन्नत्याग सोडणार नाही, असे सांगत रविकांत तुपकरांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, संयम तुटला आणि शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा तूपकर यांनी दिला आहे. ते म्हणाले,- सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा मी शहीद व्हायला तयार आहे. पण महाराष्ट्रातील सरकारला कर्जमुक्त करा, सोयाबीन दरवाढ करा, पिक वीमा उशीरा दिलेल्या कंपनींवर कारवाई करा आणि राहिलेला पिकवीमा लवकर द्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more