प्रतिनिधी
मुंबई – शिवसेनेने फ्रंटफूटवर येऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी पंगा घेतला खरा. पण यामध्ये संजय राऊत आणि युवा सेनेचे सैनिक वगळता काही नेत्यांच्या भूमिकेवर सवाल खडा झाला आहे. शिवसेनेच्या आंदोलनात एरवी फ्रंटफूटवर असणारे कोकणातले नेते आता बॅकफूटवर का…, असा तो सवाल आहे. बाळासाहेब ठाकरेंचे कडवे शिवसैनिक रामदास कदम, अरविंद सावंत, दीपक केसरकर आहेत कुठे…, असे सवाल खडे करण्यात येत आहेत. कारण हे नेते कोकणातले आहेत. नारायण राणे यांना ते ज्युनिअर असले, तरी बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाल्याने त्यांची आक्रमकता कमी नाही. why shiv sena leaders like ramdas kadam, arvind sawant and deepak kesarkar keeping mum over narayan rane arrest issue?
पण आता नारायण राणे यांच्या बरोबरचा संघर्ष निकराला आलेला असताना वर उल्लेख केलेले नेते नेमके आहेत कुठे…, असा प्रश्न शिवसैनिकच विचारू लागले आहेत.
गेली अनेक वर्षे नारायण राणेंशी दोन हात करणारे रामदास भाईंसारखे नेते इतका राडा होऊनही शांत बसले आहेत. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सातत्याने राणेंवर टीका करणारे रामदास भाई एवढे रामायण घडूनही काहीच बोललेले दिसत नाहीत. उलट विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत आलेले भास्कर जाधवच राणेंवर टीका करताना दिसत आहेत.
राणेंवर सातत्याने टीकास्त्र सोडणारे शिवसेना खासदार अरविंद सावंत हे एक आहेत. राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाले तेव्हा देखील अरविंद सावंत यांनी राणेंवर टीका केली होती. मात्र, सध्या ते देखील फारसे बोललेले दिसत नाहीत. युवा सेना आक्रमक झाल्यानेच शिवसेनेचे हे सच्चे सैनिक शांत झालेत का?, असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.
तळ कोकणात नारायण राणे यांच्याशी पंगा घेत 2014च्या निवडणुकीत शिवसेनेत दाखल झालेले दीपक केसरकर हे देखील राज्यात इतका वाद चालू असताना शांत आहेत. नेहमीच राणेंशी पंगा घेणारे दीपक केसरकर देखील या प्रकरणात काहीच बोलले नाहीत.
प्रताप सरनाईकांनी तर शिवसेना नेतृत्वाला बुचकळ्यातच टाकले आहे. इथे मीच अडचणीत आहे. इतर मंत्र्यांच्या अडचणीचे मला काय विचारता, असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारांना विचारून शिवसेना नेतृत्वाला बुचकळ्यात टाकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App