गुंतवणूक : Google Pay वर लवकरच मिळणार FD करण्याची सुविधा, एवढे असे वार्षिक व्याज

google pay may start fixed deposits services on payment app soon For users

google pay may start fixed deposits services : जगप्रसिद्ध पेमेंट अॅप गुगल पे लवकरच आपल्या युजर्सना FD करण्याची सुविधा देईल. यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना पेमेंट ऑप्शनसह गुंतवणुकीचाही पर्याय मिळेल. google pay may start fixed deposits services on payment app soon For users


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जगप्रसिद्ध पेमेंट अॅप गुगल पे लवकरच आपल्या युजर्सना FD करण्याची सुविधा देईल. यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना पेमेंट ऑप्शनसह गुंतवणुकीचाही पर्याय मिळेल.

पेमेंट अॅप GPay वरच युजर्सना FD करण्याची सुविधा देण्यासाठी गुगलने Setu नावाच्या फिनटेक कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ‘मिंट’ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सेतू कंपनीला गुगल पेच्या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रोव्हाइड करेल, जो युजर्सना पेमेंट अॅपवरच फिक्स्ड डिपॉझिट करण्याची सुविधा देईल. वृत्तानुसार, सेतूने यासाठी APIचे बीटा व्हर्जन तयार केले आहे.

GPay वर FD केल्यास मिळेल एवढे व्याज

सुरुवातीला कंपनी गुगल पेवर युजर्सना Equitas Small Finance Bank ची FD देणार आहे. यावर ग्राहकांना जास्तीत जास्त 6.35% पर्यंत वार्षिक व्याज मिळेल. तर कमीत कमी व्याज 3.5% असेल. GPay चे युजर्स Equitas Small Finance Bank च्या 7 ते 29 दिवस, 30 ते 45 दिवस, 46 ते 90 दिवस, 91 ते 180 दिवस, 181 ते 364 दिवस आणि 365 दिवसांची एफडी करू शकतील.

अशी होईल FDची KYC

GPay वरून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला KYC करावी लागेल. गुगल पेवर ही प्रक्रिया आधारवर आधारित असेल आणि ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण होईल.

सुरुवातीला फक्त इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेची एफडी जीपे वर उपलब्ध असेल, नंतर उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेची एफडीदेखील या प्लॅटफॉर्मवर आढळू शकते. अनेक लहान फायनान्स बँका फिनटेक कंपन्यांमध्ये वेगाने सामील होत आहेत आणि ग्राहकांना एफडी आणि बचत खाती इत्यादींवर अधिक व्याज देत आहेत. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने नियो आणि फ्रीओ (मनीटॅप) सारख्या फिनटेक कंपन्यांशी करार केला आहे. Google Pay मध्ये मासिक दीड कोटी सक्रिय युजर्स आहेत.

google pay may start fixed deposits services on payment app soon For users

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात