
विशेष प्रतिनिधी
मुंबई : समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरणा दिली होती, हे शाळेच्या इतिहासात कित्येक वर्षे शिकविले गेले. मात्र, काही संघटनांच्या दबावामुळे आता त्याबाबत बोललेही जात नाही. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा सगळा दबाव झुगारून समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असा सवाल केला आहे.Who will ask Shivaji Maharaj besides Samarth Ramdas Swami, Governor Koshyari asked the question under pressure
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौºयावर आहेत. यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.
कोश्यारी म्हणाले, या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही.
समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो. मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिलं आहे. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटलं असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे.
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच ट्वीट करत आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल.
Who will ask Shivaji Maharaj besides Samarth Ramdas Swami, Governor Koshyari asked the question under pressure
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून त्यांचीच फसवणूक, मुख्यमंत्र्यांसह मराठा मंत्र्यांनी राजीनामे देण्याची राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट
- Kili Paul : किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…