मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून राज्यपाल कोश्यारीं बद्दल ठाकरे सरकार मधील मंत्री यशोमती ठाकूर यांचे अपशब्द ; माध्यमांना ‘ हे ‘ दाखवण्याचे थेट आव्हान

दादांनी मला सांगितलं की तिथं गव्हर्नर म्हणून एक विक्षिप्त माणूस बसलेला आहे असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं आहे . माध्यमांना थेट आव्हान करत त्या म्हणाल्या की मिडीयावाल्यांनी हे दाखवायचं असेल तर दाखवावं.Yashomati Thakur criticize Governor Koshyari


विशेष प्रतिनिधी

सांगली : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governer bhagatasinh koshyari) यांच्या बद्दल राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (minister yashomati thakur) यांनी अपशब्दांचा वापर केला आहे .

सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी आहे. मात्र, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारी सांगलीत कृषी महाविद्यालय होण्यासाठी अडथळा आणत आहेत, असाही आरोप केला.दरम्यान पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या की, तुम्ही आम्ही संविधानाने एकत्र जोडलो गेलो आहोत म्हणून एकत्र आलोय. मात्र, त्याच संविधानावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा व्यक्ती आज महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून बसला आहे .

ते अडथळे आणत आहेत म्हणून सांगलीत कृषी महाविद्यालय होत नाहीये. असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सांगलीत कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी होती. मात्र, दादांनी मला सांगितलं की तिथं गव्हर्नर म्हणून एक विक्षिप्त माणूस बसलेला आहे. मीडियावाल्यांना हे दाखवायचं असेल तर दाखवा असं देखील त्या म्हणाल्या.

Yashomati Thakur criticize Governor Koshyari

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*