– अमोल मिटकरी यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचे काम बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोकं करत आहेत. सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांची सुपारी कुणी दिली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल दूबे प्रकरणात सुरेश धस तोंडघशी पडले आहेत. ते महायुतीचे आमदार आहेत. आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही पण मुंडे भाऊ-बहीणींना मंत्रिपद मिळाले याचा पोटशूळ उठल्याचे दिसत आहे असा आरोप करत मिटकरी म्हणाले, धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळाल्याच्या असुयेतून सुरेश धस त्यांना लक्ष्य करत आहेत . जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचे राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिलीय? याचा तपास करण्याची गरज आहे
या सोबतच अंजली दमानिया, संजय राऊत आणि संदीप क्षीरसागर हे एकाच भाषेत कसं बोलतात? असा सवालही त्यांनी केला.
मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या केली गेली ती निंदनीय आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही मिटकरी यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App