पुणे जिल्ह्यातील 27 गावांमध्ये टँकरने पाणी, नळाने पुरवठा केव्हा ? महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरणार केव्हा ?


वृत्तसंस्था

पुणे : पुणे जिल्ह्यात 27 गावे आणि 129 वाड्यावस्तीत 46 टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. एकंदरीत राज्यकर्त्यांना अजूनही नळाने जनतेला पाणी देता आलेलं नाही. तसेच महिलांच्या डोक्यावरील हांडे केव्हा उतरणार ? हा प्रश्न सोडविणार कोण ? When to supply water by tanker to 27 villages in Pune district

जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाणलोट क्षेत्रात टंचाई सुरु झाली आहे. 

जिल्ह्यात टँकरची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सर्वाधिक रकमेचा टंचाई आराखड्याला मंजुरी दिली होती. त्या अंतर्गत तलाव खोदणे, विंधन विहिरी खोदणे गाळ उपसणे, नळपाणी पुरवठा योजना राबविणे अशी कामे हाती घेतली असून ती प्रगतीपथावर आहेत.

आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक टँकर

आंबेगाव, भोर, हवेली, खेड, जुन्नर या तालुक्यातील काही गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. 37 हजारावर नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.

When to supply water by tanker to 27 villages in Pune district

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*