बारामतीच्या डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांचं विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरमध्ये माध्यमिक व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षण झालं.What is missing from Pune: The people of Baramati have become international scientists
विशेष प्रतिनिधी
बारामती : गेल्या सात वर्षांमध्ये जगातील तब्बल 19 देशांना तूरीच्या 118 वेगवेगळ्या व्हरायटीज देण्याचे महत्वाचे काम बारामतीच्या डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांनी केले आहे. अशा प्रकारे काम करणा-या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. यांची निवड ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेनच्या इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA) या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे. प्लँट म्युटेशन ब्रिडींगवर तेथे त्या संशोधन करणार आहेत.
व्हिएन्ना येथेही त्या संशोधनाचेच काम करणार असून मानवजातीच्या उपयुक्ततेसाठी प्रामुख्याने त्यांच्या संशोधनाचे काम चालणार आहे. भारतामध्ये काम करताना त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, ओरिसा, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यात संशोधनाचे मोठे काम केलेले आहे.
दरम्यान, बारामतीच्या डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांचं विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरमध्ये माध्यमिक व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुण्यात त्यांनी बी.एस्सी. हॉर्टिकल्चर केले. जिनॅटिक्स व प्लँट ब्रिडींग या विषयात त्यांनी एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. राहुरी कृषी विद्यापीठात त्यांनी कपाशी या पिकावर पीएच.डी. प्राप्त केली.
पुण्यात एक वर्षाची नोकरी केल्यानंतर हैदराबाद येथे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अँरिड ट्रॉपिक (ICRASAC) यामध्ये तूर पैदासकार शास्त्रज्ञ म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. गेल्या चार वर्षांपासून एशिया प्रोग्राम लीडर म्हणून त्यांनी या विषयात काम केले आहे.
जगामधील कडधान्यातील पहिले हायब्रिड वाण विकसीत करण्यामध्ये डॉ. अनुपमा हिंगणे यांचा सिंहाचा वाटा आहे. या शिवाय सर्वात लवकर येणारे (सुपर अर्ली व्हरायटी) तूरीचे वाण जागतिक स्तरावर विकसित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App