मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेचे आदेश; खंडणीप्रकरणी ठाण्यात गुन्हा


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याअटकेचे आदेश न्यायालयाने काढले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यास पोलिसांना सांगितले आहे.Order to arrest parambir singh and produce him in court

खंडणीप्रकरणी तसेच धमकावल्याप्रकरणी परमबीर यांच्याविरोधात ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यासंबंधीचे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने काढले आहे. या प्रकरणात वॉरंट काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.



परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. २०१८ मध्ये ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने एका प्रकरणात सोनू जालान आणि केतन तन्ना यांना   अटक केली होती. त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई  टाळण्यासाठी परमबीर यांच्यासह २८ जणांनी त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा  आरोप झाला होता. याप्रकरणी तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Order to arrest parambir singh and produce him in court

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात