वृत्तसंस्था
दुबई : न्यूझीलंड विरोधातील सामन्यासाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी सज्ज झाला आहे. गेल्या आठवड्यात भारताचा पाकिस्तानकडून मोठा पराभव झाला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी शमीला ट्रोल केले. आता तो पाकिस्तानच्या पराभवाची कसर न्यूझीलंड विरोधातील सामन्यात भरून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.Indian for the match against New Zealand Bowler Mohammad Shami ready; Will make up for Pakistan’s defeat
टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी समाजमाध्यमांवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली.
या संपूर्ण प्रकरणानंतर शमी पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताला आता रविवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे.या सामन्यापूर्वी मोहम्मद शमी सरावात परतला. शमीने सोशल मीडियावर त्याचा ट्रेनिंग फोटो शेअर करत लिहिले, ”ट्रेनिंगवर परतलो.
उत्तम प्रशिक्षण सत्र झाले आणि आमच्या युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंशी संवाद साधताना आनंद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे.” शमीने टीकाकारांना कोणतेही उत्तर न देता आपल्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे.
दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. या लढतीत शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या. त्यामुळे काही जल्पकांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more