माझे काय चुकले! पराभवानंतर राजू शेट्टी यांची शेतकऱ्यांना भावनिक पोस्ट

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. ‘माझे काय चुकले! शेतकऱ्यांनो तुम्हीही…’ अशा स्वरुपाची पोस्ट त्यांनी केली आहे. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अत्यंत अटीतटीची ही लढत झाली. यामध्ये धैर्यशील माने हे फक्त 13426 मतांनी विजयी झाले आहेत. माने यांना एकूण 520190 मते मिळाली तर सत्यजीत पाटील यांना एकूण 506764 मते मिळाली. तर राजू शेट्टींना एकूण 179850 मते मिळाली. या निवडणुकीत राजू शेट्टींचा तब्बल 3 लाख 40 हजार मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे हा पराभव राजू शेट्टी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे.What did I miss! Raju Shetty’s emotional post to farmers after defeat



राजू शेट्टी यांनी याच मतदारसंघाचे या आधी देखील प्रतिनिधीत्त्व केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात त्यांच्या संघटनेचे मजबूत जाळे आहे. त्यामुळे ही लढाई आपण जिंकणार असा विश्वास राजू शेट्टी यांना वाटत होता. सर्वसामान्य शेतकरी विरुद्ध भांडवलशाही विरोधात ही लढाई असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले होते. मात्र, या मतदारसंघातून शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.

तिरंगी लढत होण्याचा अंदाज होता मात्र, शेट्टी मागे पडले

शेततऱ्यांच्या प्रश्न घेऊन लढणारे राजू शेट्टी यांनी क्रमांक तीनची मते मिळाली आहेत. वास्तविक या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, राजू शेट्टी विजयाच्या खुपच मागे राहिले. वास्तविक एक्झिट पोलमध्येही राजू शेट्टी यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, दारुण पराभव पत्करावा लागल्याने राजू शेट्टी यांच्या जिव्हारी लागला आहे.

What did I miss! Raju Shetty’s emotional post to farmers after defeat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात