Weather Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात पारा शून्यावर, दोन-तीन दिवसांत अवकाळीचीही शक्यता


राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. आज (१२ जानेवारी, बुधवार) मध्यरात्री महाराष्ट्राचे हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळी सहा वाजता ते वेण्णा तलावाजवळ केवळ एक अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. एक दिवसापूर्वीच्या तुलनेत आज हे तापमान चार अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. तापमान शून्य अंशावर गेल्याने दवबिंदू गोठले होते. दरम्यान, हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. Weather Alert: Extreme cold in Maharashtra, temprature recoreded zero celsius in Mahabaleshwar, possibility of rain in two-three days


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. आज (१२ जानेवारी, बुधवार) मध्यरात्री महाराष्ट्राचे हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळी सहा वाजता ते वेण्णा तलावाजवळ केवळ एक अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. एक दिवसापूर्वीच्या तुलनेत आज हे तापमान चार अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. तापमान शून्य अंशावर गेल्याने दवबिंदू गोठले होते. दरम्यान, हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत पावसामुळे थंडी आणखी वाढणार आहे. सध्या पर्यटकांना महाबळेश्वर सिमल्याप्रमाण भासत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे तापमानात एवढी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही तापमानात अशीच घसरण झाली आहे. सातपुड्यातील घनदाट व दुर्गम जंगलाच्या परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोक घरात बसले आहेत. जास्त हिवाळ्याच्या बाबतीत नंदुरबार जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. येथील तापमान सात अंशांपर्यंत घसरले आहे.

अवकाळी पावसाचा इशारा

नागपूरसह महाराष्ट्रातील विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात थंडीची लाट आहे. विदर्भातही थंडी वाढली असली तरी येथे अवकाळी पावसाचा प्रभाव अधिक आहे. नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात मोठी घट तर झाली आहेच, शिवाय रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे सुमारे दोन लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) नागपूरस्थित केंद्राने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी गुरुवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.



मुंबई-ठाणे-पुणे-नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही थंडीचा कडाका राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि कोकण विभागातील तापमानातही झपाट्याने घट झाली आहे. नांदेड, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यांतही तापमानात मोठी घट झाली आहे. 15 जानेवारीपर्यंत मुंबई-ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रातील तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज मुंबईचे तापमान किमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. कमाल तापमानाबद्दल बोलायचे तर ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. आकाश निरभ्र होईल.

Weather Alert: Extreme cold in Maharashtra, temprature recoreded zero celsius in Mahabaleshwar, possibility of rain in two-three days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात