लतादीदींना न्युमोनिया, आणखी 10 -12 दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच उपचार


वृत्तसंस्था

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोना संसर्गा बरोबरच न्युमोनियाही झाला आहे. त्या सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. Singer Lata Mangeshkar continues to be in the ICU ward. She will be under observation for 10-12 days

लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग याबरोबरच न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर दोन्ही विकारांसंदर्भात उपचार सुरू आहेत. त्यांचे 92 हे वय लक्षात घेता त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.

लतादीदींना आणखी 10 – 12 दिवस उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागेल. त्यानंतरच पूर्ण तपासणी करून घरी सोडण्यात येईल, असे डॉ. समदानी म्हणाले.

Singer Lata Mangeshkar continues to be in the ICU ward. She will be under observation for 10-12 days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात