सतर्कतेचा इशारा : राधानगरी धरणातून तांत्रिक अडचणीमुळे पाण्याचा विसर्ग वाढला! पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. काही तांत्रिक काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला आणि हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Warning: Discharge of water from Radhanagari dam increased due to technical problem! Warning to the villages along the Panchganga river

पंचगंगा नदीची पातळी तीन ते चार फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.


Maharashtra Flood : माणुसकी : पूरग्रस्त भागात दररोज १५,००० थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर ! कोरोना योद्धयांना देखील पुरवल्या १० लाख थाळ्या


आज सकाळी साडेआठ वाजता राधानगरी धरणातील सर्व्हिसिंग गेटचे काम सुरू होते. त्यावेळी दरवाजा खाली घेण्याचे काम सुरू असताना ही तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि दरवाजा अडकला. त्यामुळे धरणातुन नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Warning: Discharge of water from Radhanagari dam increased due to technical problem! Warning to the villages along the Panchganga river

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात