उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोडार्चे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात पार्थिवावर अग्निसंस्काराची इच्छा व्यक्त केली आहे. कट्टरपंथिय आपले दफन करू देणार नाहीत असे म्हणतात. त्यामुळे आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दफनभूमीमध्ये दफन न करता स्मशानात अग्नी देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत असे म्हटले आहे.Waqf board members say no burial, cremation, In the will, expressed his desire for cremation
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोडार्चे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात पार्थिवावर अग्निसंस्काराची इच्छा व्यक्त केली आहे. कट्टरपंथिय आपले दफन करू देणार नाहीत असे म्हणतात. त्यामुळे आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दफनभूमीमध्ये दफन न करता स्मशानात अग्नी देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत असे म्हटले आहे.
रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये पार्थिवाला अग्नी देण्याचे अधिकार डासना मंदिराचे महंत नरसिम्हा नंद सरस्वती यांना देत असल्याचं म्हटलं आहे. रिझवी यांनी यासंदभार्तील एक व्हिडीओही जारी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांची हत्या करण्याचा किंवा शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे. माझी हत्या करणाऱ्याला पुरस्कार देण्याचीही वक्तव्य केली जात आहे. मी कुराणमधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. माझा गुन्हा हा आहे की मी पैगंबर ए-एस्लाम हजरत मोहम्मद यांच्यावर एक पुस्तक लिहिलं. त्यामुळेच कट्टरपंथी मला मारण्याचा कट रचत आहेत.
माझ्या पार्थिवाला दफनभूमीमध्ये जागा दिली जाणार नाही असेही या कट्टरपंथींकडून सांगितले जात असल्याचे सांगून रिझवी म्हणाले त्यामुळेच माझ्या मृत्यूनंतर देशामध्ये शांतता कायम रहावी म्हणून मी मृत्यूपत्र लिहून प्रशासनाला पाठवत आहे. माझ्या मरणानंतर माझ्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत. माझे पार्थिव लखनऊमधील हिंदू मित्रांच्या स्वाधीन करावे आणि त्यानंतर चिता रचून त्यावर अंत्यसंस्कार करावेत. माझ्या चितेला अगदी नरसिम्हा नंद सरस्वती यांनी द्यावा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App