
Vinayak Mete : राज्य सरकारने नुकतीच राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवस वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मेटे म्हणाले की, आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजामध्ये मोठा असंतोष आहे. मराठा समाजाने आंदोलन करू नये यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लांबवले आहे. Vinayak Mete Criticizes Thackeray Govt on Maratha Reservation And Lockdown in Beed
विशेष प्रतिनिधी
बीड : राज्य सरकारने नुकतीच राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवस वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मेटे म्हणाले की, आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजामध्ये मोठा असंतोष आहे. मराठा समाजाने आंदोलन करू नये यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लांबवले आहे.
मेटे म्हणाले की, मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर जो असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजात पसरला तो असंतोष रस्त्यावर येऊ नये, मराठा समाजाने संघर्ष करू नये, आंदोलन करू नये, मोर्चे काढू नये आणि सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ नये यासाठीच ठाकरे सरकारने लॉकडाऊन जाणीवपूर्वक वाढवला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकारांशी बोलताना विनायक मेटे यांनी बीडमधून मोठ्या आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले होते. 24 मे रोजी मराठा समाजाचा विशाल मोर्चा काढणार असल्याचे ते माध्यमांना म्हणाले होते. यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवला तर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते.
मेटे म्हणाले होते की, लॉकडाऊन कायम राहिले तर 18 मे रोजी प्रत्येक तहसीलमध्ये इशारा आंदोलन केले जाईल. लॉकडाऊनदरम्यान 21 ते 23 मे या काळात प्रतयेक जिल्ह्यात मंत्र्यांची वाहने रोखली जातील. तसेच शिवसंग्रामचे कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाहने मुंबईत रोखतील. नियमांचे पालन करून आंदोलन केले जाईल, कारण रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणे कठीण असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले होते.
Vinayak Mete Criticizes Thackeray Govt on Maratha Reservation And Lockdown in Beed
महत्त्वाच्या बातम्या
- डिसेंबरपर्यंत भारतात कोरोना लसीचे 216 कोटी डोस, कोणत्या कंपनीचे किती डोस मिळतील? वाचा सविस्तर
- Inspiring : पुण्याचे Plasma Man अजय मुनोत, कोरोना रिकव्हरीनंतर ९ महिन्यांत तब्बल १४ वेळा प्लाझ्मा दान
- ऑक्सिजन ऑडिटची वेळ येताच दिल्ली सरकारचा यूटर्न, गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन असल्याचे म्हणत इतर राज्यांना देण्याचे केंद्राला पत्र
- कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर कधी घ्यावी लस, सरकारच्या तज्ज्ञ समितीने काय म्हटले? वाचा सविस्तर…
- लवकरच 2 ते 18 वर्षे वयोगटालाही मिळणार लस, DGCIची भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी मंजुरी
- इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पॅलेस्टाईनशी सुरू असलेल्या युद्धावर भाष्य